FIFA World Cup 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत (Fifa World Cup 2022)  दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने (France) मोरोक्कोचा (Morocco) पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे. फ्रान्सने मोरक्कोचा 2-0 असा पराभव केला. फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी फ्रान्सने फिफा विश्वचषक 2018 जिंकला होता. अंतिम फेरीत फ्रान्सचा मुकाबला लिओनल मेस्सीचा संघ अर्जेंटिना (Argentina) बरोबर असणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे.


पहिला गोल पाचव्या मिनीटाला


फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर एकूण चार वेळा फ्रान्स फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आता अर्जेंटिनासोबत फ्रान्सचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, फ्रान्स आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सामन्यात पहिला गोल फ्रान्सच्या थेओ हर्नांडेझने पाचव्या मिनिटाला केला. अशाप्रकारे फ्रान्सचा संघ 1-0 ने पुढे गेला. थिओ हर्नांडेझने मोरोक्कोचा गोलरक्षक बुनौ याला चकवून उत्कृष्ट गोल केला. 


मोरोक्कोचं स्वप्न भंगले


फ्रान्ससाठी रँडल कोलो माउनीने दुसरा गोल केला. त्याने 79 व्या मिनिटाला हा गोल केला. अशाप्रकारे फ्रान्सने सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. रँडल कोलो मुआनी हा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला असला तरी त्याने अवघ्या 44 सेकंदांनंतर त्याने गोल केला. फ्रान्स संघाने चांगला खेळ करत सामना 2-0 असा जिंकला. अशाप्रकारे मोरोक्कोच्या पराभवाने आफ्रिकन आणि अरब देशांचे स्वप्न भंगले आहे. मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे.


फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये दोनदा जेतेपद पटकावले होते


मोरोक्को सोबतचा सामना जिंकून फ्रेंच संघानं सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये दोनदा जेतेपद पटकावले होते. तर 2006 मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. फ्रान्सचा संघही दोनदा तिसऱ्या क्रमांकावर आणि एकदा चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. यावेळी फ्रान्सचा संघ एकूण सातव्यांदा टॉप-4 मध्ये पोहोचला आहे. त्यामुळं आता 18 डिसेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्स अर्जेंटिनाला पराभूत करुन विश्वचषक जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Fifa World Cup 2022 : फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध कोणता संघ? आज ठरणार, मोरोक्को विरुद्ध फ्रान्स लढत, कधी, कुठे पाहाल सामना?