Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आज सेमीफायनलचा दुसरा सामना फ्रान्स आणि मोरोक्को (France vs Morocco) या संघामध्ये रंगणार आहे. मंगळवारी उशिरा झालेल्या अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया सामन्यात (ARG vs CRO) अर्जेंटिनाने 3-0 ने विजय मिळवत फायनल गाठली असून आता फ्रान्स आणि मोरोक्कोमधील कोणता संघ अर्जेंटिनाविरुद्ध फायनलमध्ये मैदानात उतरणार हे आज ठरणार आहे.


मोरोक्कोने आतापर्यंत उत्कृष्ट  डिफेन्सच्या जोरावर स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. डिफेन्स हीच त्यांची तगडी बाजू आहे.पण आज फ्रान्स संघात दमदार खेळाडू असून एमबाप्पे आणि ऑलिव्हियर गिरौड यांच्यासमोर मोरोक्कला आणखी तगडा डिफेन्स करावा लागणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून फ्रान्सला त्यांच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या आशा आहेत. मोरोक्कोच्या बचावफळीने या खेळाडूंना रोखले, तर सामना त्यांच्यासाठी थोडा सोपा होऊ शकतो. याशिवाय फ्रेंच संघाचा डिफेन्सही दमदार आहे. 


कधी, कुठे पाहाल सामना?


आजचा फ्रान्स विरुद्ध मोरोक्को सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.






फ्रान्स विरुद्ध मोरोक्को Head to Head


फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात आतापर्यंत केवळ पाच सामने झाले असून त्यापैकी चार मैत्रीपूर्ण सामने झाले आहेत. याआधी अखेरीस दोन्ही संघ 2007 मध्ये एकमेकांसमोर आले होते. फ्रान्सने चार वेळा मोरोक्कोचा पराभव केला आहे आणि 2007 मध्ये झालेला शेवटचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.


हे देखील वाचा-