FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकात आज क्रोएशिया आणि मोरोक्को (Croatia vs Morocco) आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघात तिसऱ्या स्थानासाठी लढत होणार आहे. क्रोएशिया आणि मोरोक्को यांना फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाला अर्जेंटिनाकडून 0-3 असा सामना गमवावा लागला. तर, फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला.
ट्वीट-
ट्वीट-
क्रोएशियाचा संघ लुका मॉड्रिचला विजयी निरोप देण्याच्या तयारीत
२०२२ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या क्रोएशियानं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. क्रोएशियाच्या संघात लुका मॉड्रिक, पेरिसिक, क्रेमरिच आणि लावरान सारखे अनेक स्टार खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिचचाही हा शेवटचा विश्वचषक सामना असेल. अशा स्थितीत क्रोएशिया आपल्या स्टार खेळाडूला विजयासह विश्वचषकाचा निरोप देऊ इच्छितो.
क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यातील शेवटचा सामना
या फुटबॉल विश्वचषकात क्रोएशिया आणि मोरोक्कोचं संघ एकाच गटात होते. दोघांमधील सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात क्रोएशियानं 57% बॉल आपल्या जवळ ठेवला. तर, गोल अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात मोरोक्कोनं बाजी मारली होती. क्रोएशियानेही मोरोक्कोच्या गोलपोस्टवर सहा वेळा आक्रमण केलं. गेल्या सामन्यात क्रोएशियाने 592 पास पूर्ण केले. तर, मोरोक्कन संघाला 290 पास पूर्ण करता आले.
सामना कधी आणि कुठे बघायचा?
क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात आज (17 ऑक्टोबर) फिफा विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. हा भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 1 (Sports18 1) आणि स्पोर्ट्स 18 एचडी (Sports18 1HD) वर केलं जाईल. मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा आणि एमटीव्ही एचडी अॅपवरही उपलब्ध असेल.
हे देखील वाचा-