Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) इंग्लंड विरुद्ध इराण (England vs Iran) सामना पार पडला. दमदार फॉर्मात असलेल्या बलाढ्य इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. यावेळी सर्वाधिक गोल्स इंग्लंडच्या बी. साका याने केले, त्याने 2 उत्कृष्ट गोल्स केले. तर इराण संघाकडून मेहदी तरेमी यानेच दोन गोल केले. पात्रता फेरी सामन्यातही त्यानेच संघासाठी सर्वाधिक गोल केले होते. आजही त्याचा फॉर्म दिसून आला. पण इंग्लंडचा खेळ कमालीचा दमदार असल्याने 6-2 ने इराणचा पराभव झाला.
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने 16 व्या वेळेस स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तर इराणचा संघ सहाव्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध आमने-सामने आले होते. दरम्यान सामना इंग्लंडने जिंकल्याने हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर पोहोचला आहे. सामन्याचा विचार करता इंग्लंड संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 35 व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर 43 व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईमनंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत (45+1) गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी 3-0 ची मोठी आघाडी घेतली.
हाल्फ टाईमनंतर 65 व्या मिनिटाला इराणच्या मेहदी तरेमीने गोल केला. पण इराण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार तोवरच 71 स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. 89 व्या मिनिटाला जॅक ग्रेयलिशने आणखी एक गोल करत इंग्लंडची आघाडी तब्बल 6 गोल केली. ज्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये (90+1) इराणकडून मेहदी तरेमीने पेनल्टीवर गोल केल्यामुळे इराणने 6-2 अशा फरकाने सामना गमावला. या विजयासह इंग्लंड संघाने ग्रुप B मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांच्या नावावर 3 गुण आले असून मोठ्या गोल फरकाने सामना जिंकल्याने त्यांची गटातील स्थिती मजबूत झाली आहे.
हे देखील वाचा-