FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ची सुरुवात 20 नोव्हेंबर (रविवार) पासून झाली. जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर (Ecuador vs qatar) यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान कतारच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. कारण फिफा विश्वचषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देश असणाऱ्या संघाने सलामीचा सामना गमावला आहे. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इक्वेडोरने यजमानांचा 2-0 असा पराभव केला.
कतारपूर्वी 22 देशांनी फिफा विश्वचषकाचे आयोजन केले आहे. यापैकी 16 देश असे आहेत की त्यांना विश्वचषकातील पहिला सामना जिंकण्यात यश आले. तर 6 देशांनी वर्ल्डकपचा पहिला सामना ड्रॉ केला आहे. पण फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात यजमानपद भूषवताना पराभव कोणीच पत्करलेला नाही. विशेष म्हणजे कतारचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.
सामन्याचा लेखा-जोखा
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला इक्वेडोरनं गोल डागत कतारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण रेफरीनं VAR द्वारे गोल रद्द झाल्याचं घोषित केलं. हा गोल व्हॅलेन्सियानं केला होता. त्यानंतर याच सामन्याच्या 16व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 31व्या मिनिटाला व्हॅलेन्सियानं शानदार हेडर करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. कतारच्या डिफेन्सच्या चुकीमुळेच इक्वाडोरला दुसरा गोल डागण्याची संधी मिळाली. सेकंड हाफमध्ये कतारनं इक्वाडोरला पूर्वार्धाच्या तुलनेत कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं. कतारनं डिफेंडकरत गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्वन इक्वेडोरनं सफल होऊ दिले नाहीत. सामन्याच्या 67व्या मिनिटाला पेड्रो मिगुएलने कतारसाठी गोल डागण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पदरी अपयशच आलं. इक्वेडोरचं प्रसंगावधान आणि उत्तम डिफेंड यामुळे यजमान कतारला पहिल्याच सामन्यात परभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या काही मिनिटांत कतारचा संघ अधिक आक्रमक दिसला, तर सामन्याच्या पूर्वाधापासूनच आघाडीवर असलेला इक्वेडोर फुटबॉल संघ डिफेंन्सच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ज्यानंतर अखेर 2-0 अशा फरकानं इक्वेडोरनं कतारवर (Ecuador beat qatar) विजय मिळवला.
हे देखील वाचा-
Fifa World Cup 2022 : आज बलाढ्य इंग्लंडसमोर इराणचं आव्हान, पहिल्यांदाच दोघेही एकमेंकाविरुद्ध मैदानात