EURO Cup : फुटबॉलमधील प्रसिद्ध स्पर्धा यूरो कपला सुरुवात झाली आहे. यूरो कपच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सनं ऑस्ट्रियाला 1-0  असं पराभूत केलं. पहिल्याच मॅचमध्ये फ्रान्स आणि ऑस्ट्रियामध्ये जोरदार लढत झाली. यामध्ये फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. तरी देखील एमबाप्पे खेळत राहिला. फ्रान्सनं 1-0 नं ऑस्ट्रियाला पराभूत केलं. मात्र, पुढंच्या मॅचेसध्ये एमबाप्पे खेळणार की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे. 


फ्रान्सनं सोमवारी ग्रुप डी मध्ये पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करत यूरो कपमध्ये विजयानं सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये एमबाप्पेनं दिलेल्या क्रॉसवर ऑस्ट्रियाच्या बचाव फळीचा खेळाडू मैक्सिमिलियन वोबरनं सेल्फ गोल केला. त्यामुळं फ्रान्सला 1 गुण मिळाला.  यामुळंच फ्रान्सनं विजय मिळवला. 


फ्रान्सला 1 गुण कसा मिळाला?
मैक्सिमिलियन वोबरनं फ्रान्स विरुद्ध पहिल्या हाफच्या सातव्या मिनिटाला सेल्फ गोल केला. यामुळं फ्रान्सला विजयी आघाडी मिळाली. एमबाप्पेनं मारलेला कटबॅक अडवून आपल्या संघाच्या खेळाडूकडे मारण्याच्या प्रयत्नात वोबरनं आपल्याच संघाच्या नेटमध्ये गोल केला. 



एमबाप्पे दुसऱ्या हाफमध्ये एमबाप्पेनं ऑस्ट्रियाचा बचाव फळीचा खेळाडू केविन डैनसो याला धडक दिली. यामुळं एमबाप्पेचं नाक फुटलं. टीव्हीवर एमबाप्पेचं नाक फुटल्याचं दिसून येत होतं. एमबाप्पेची जर्सी रक्तानं माखली होती. यापूर्वी एमबाप्पेला एक गोल करण्याची संधी मिळाली होती मात्र त्यात तो अपयशी ठरला होता.  


डेसचैम्प्सनं मॅच संपल्यानंतर एमबाप्पेच्या नाकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली. फ्रान्स मीडियाच्या रिपोर्टनुसार सोमरावीर रात्री एमबाप्पेच्या नाकावर शस्त्रक्रिया झालेली नाही. आता पुढील मॅचमध्ये एमबाप्पे खेळणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. 


काही मीडिया रिपोर्टनुसार एमबाप्पे यूरो कपच्या ग्रुप स्टेजमधील दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. नॉकआऊटमधील सामन्यांमध्ये एमबाप्पे पुन्हा संघाकडून खेळेल असं सांगण्यात येत आहे. यामुळं नेदरलँडस आणि पोलंड विरुद्ध एमबाप्पे खेळण्याची शक्यता कमी आहे. 


फ्रान्सची दुसरी मॅच 21 जूनला नेदरलँड विरुद्ध होणार आहे.  


फ्रान्सचे प्रशिक्षक डिडीयार डेसचॅम्प्स यांनी एमबाप्पेच्या दुखापतीविषयी भाष्य केलं आहे. एमबाप्पे चांगल्या स्थितीत नसून त्याचं नाक फुटलं आहे. आजच्या खेळातील आमच्यासाठी ती दुर्दैवी गोष्टी होती, असं फ्रान्सचे प्रशिक्षक म्हणाले.  


इतर बातम्या :


T20 World Cup 2024: "बाबर आझमने पॉलिटिक्स केलं, आफ्रिदीला खाली खेचण्यासाठी मोहम्मद आमिरची निवड"


Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!