Euro Cup Final 2024 England vs Spain: स्पेनने युरो कपच्या (Euro Cup 2024) अंतिम सामन्यात इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून चौथ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळविले. याआधी स्पेनने संघाने 1964, 2008 आणि 2012 मध्ये युरो कपचे विजेतेपदही पटकावले आहे. स्पेनने सर्वाधिक चार युरो कप जिंकत जर्मनीलाही मागे टाकले आहे. 






स्पेनकडून सतत इंग्लंडच्या पेनल्टी क्षेत्ररक्षणावर आक्रमण सुरु राहिले. स्पेनने दुसऱ्या हाफमधील पहिल्याच मिनिटाला गोल मिळवला. 47 व्या मिनिटाला यमालच्या पासवर निको विलियम्सने इंग्लंडच्या गोलरक्षकाला चकवून अप्रितम गोल केला. यानंतर 73 व्या मिनिटाला कोल पाल्मरने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. परंतु 87 व्या मिनिटाला मिकेल ओयारझबालच्या भन्नाट गोलने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली.  हा गोल स्पेनचा विजय पक्का करण्यासाठी पुरेसा ठरला आणि इंग्लंड 2-1 असा फरकाने पराभूत करण्यात यश मिळवले.






इंग्लंडच्या खेळाडूंचा एकच जल्लोष-


इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा युरो चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला. विक्रमी विजयानंतर यामल, मार्क कुकुरेला आणि डॅनी ओल्मो हे इतर इंग्लंड संघातील फुटबॉलपटू प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. या खेळाडूंनी स्टेडियमच्या पूर्वेकडील टोकापर्यंत जाऊन इंग्लंडच्या चाहत्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला.






इंग्लंडच्या पदरी निराशाच-


1966 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडला गेल्या 58 वर्षात कोणतीही मोठी फुटबॉल स्पर्धा किंवा विजेतेपद जिंकता आलेले नाही. युरो कप 2024 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंड संघाने अंतिम फेरी गाठल्यानंतर ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स विल्यम देखील सामना पाहण्यासाठी आले होते. अंतिम सामन्यात स्पेनचा राजा फेलिपही उपस्थित होते.