Fifa World Cup 2022 News : फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये फ्रान्सने मोरोक्कोवर 2-0 (FRA vs MOR) अशी मात केली. ज्यामुळे फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, मोरोक्कोच्या चाहत्यांना पराभव पचवता आलेला नाही आणि फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपर्यंत जोरदार गोंधळ फॅन्सनी उडवला.


विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलमध्ये मोरोक्कोचा पराभव झाला आणि  मोरोक्को संघाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे त्यांचे चाहते कमालीचे नाराज झाले. काही चाहत्यांनी फ्रान्सच्या ब्रुसेल्समधील साऊथ स्टॅटनजवळ पोलिसांवर फटाके आणि इतर वस्तू फेकल्या. चाहत्यांचा संताप वाढतच गेला, मोरोक्कोच्या चाहत्यांनी तिथे जाळपोळही केली आणि कचऱ्याच्या पिशव्या देखील जाळल्या. जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणिधु राचाही वापर केला आणि अनेक मोरोक्कन चाहत्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडणं मोरोक्को फॅन्सच्या चांगलच जिव्हारी लागल्याचं दिसून आलं आहे.


पाहा VIDEO-






 


सामन्याचा लेखा-जोखा


फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अर्जेंटिनासोबत फ्रान्सचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, फ्रान्स आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सेमीफायनलच्या सामन्याचा विचार करता सामन्यात पहिला गोल फ्रान्सच्या थेओ हर्नांडेझने पाचव्याच मिनिटाला केला. ज्यामुळे त्यांनी सामन्यात आघाडी घेतली. थिओ हर्नांडेझने मोरोक्कोचा गोलरक्षक बुनौ याला चकवून उत्कृष्ट गोल केला. त्यानंतर सामना जवळपास संपेपर्यंत फ्रान्स 1-0 च्या आघाडीवर होता. मोरोक्को संघाला त्यांनी एकही गोल करु दिला नाही. अखेर रँडल कोलो माउनीने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरत अवघ्या 44 सेकंदांनंतर गोल केला आणि फ्रान्सची आघाडी 2-0 अशी केली. त्याने 79 व्या मिनिटाला हा गोल केला. अशाप्रकारे फ्रान्सने सामन्यात 2-0 अशी आघाडी घेत ही आघाडी अखेरपर्यंत टीकवली आणि सामना जिंकला.   


हे देखील वाचा-