International Chess Federation: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची (Viswanathan Anand) रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची (FIDE) उपाध्यक्षपदी निवड झालीय. विद्यमान अध्यक्ष आर्केडी वोर्कोविच हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आले आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 44 व्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे काँग्रेसदरम्यान या निवडणुका झाल्या आहेत. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंद ड्वोरकोविचच्या संघाचा भाग होता. ड्वोर्कोविचला एकूण 157 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी आंद्री बॅरीशपोलेट्स यांना केवळ 16 मते मिळाली. यातील एक मत अवैध ठरलं. तर, मतदानात सहभागी झालेले पाच जण गैरहजर राहिले आहेत.
विश्वनाथन आनंदनं किशोर वयात चर्चेत आला होता, ज्यावेळी त्यानं विश्व जूनियरचं खिताब जिंकून पहिल्यांदा ग्रॅडमास्टर बनला. बुद्धिबळाच्या जागतिक मंचावर विश्वनाथन भारताचं नेतृत्व करत आहेत. आनंदनं पाच विश्वविजेतेपदे पटकावली आहेत. त्यानं 2017 मध्ये त्याचं शेवटचं विश्व खिताब जिंकलं आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग नसून यजमान देशातील सर्व संघांना मार्गदर्शन करत आहे. त्यानं प्रशासक म्हणून खेळासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. व्होर्कोविच आणि त्याच्या टीमच्या पहिल्या कार्यकाळातील कामाचं कौतुक केलं. या निवडणुकीपूर्वी व्होरकोविचनं आनंदला आपल्या संघात ठेवण्याबाबत बोललं होतं.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : 'चित भी मेरी, पट भी मेरी', ट्रीपल जम्पमध्ये सुवर्ण पदकासह रौप्यही भारताच्या खिशात, ऐलडॉस पॉलसह अब्दुलाची कमाल
- Commonwealth Games 2022: संदीप कुमारनं जिंकलं कांस्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत दमदार कामगिरी
- Amit Panghal,CWG 2022: अमित पंघालची सुवर्णपदकावर झडप, भारताची पदकसंख्या 43 वर