CWG 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतानं अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये आणखी एक पदक मिळवलं आहे. भारताचा अॅथलीट संदीप कुमार याने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावलं आहे. संदीप कुमार याने 38:49.21 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं आहे.
अविनाशसह प्रियांका नेही जिंकलं रौप्यपदक
अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी देखील भारताने दोन पदकं मिळवली. भारताची महिला अॅथलीट प्रियांका गोस्वामीने याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं तिने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अंतर कापलं होतं. प्रियांका पाठोपाठ महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं होतं.
भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू
सुवर्णपदक-16: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, अल्धौस पॉल.
रौप्यपदक-12: संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर.
कांस्यपदक- 19: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Day 10 Schedule: निकहत जरीन, शरत कमल आणि महिला क्रिकेट संघावर सर्वांचं लक्ष, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक
- क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागला अन् तरुणाचा जीव गेला; पंढरपुरातील धक्कादायक घटना