CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतानं पुरुषांच्या ट्रिपल जम्प स्पर्धेत अगदी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकासह रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. एकाच स्पर्धेत भारताच्या ऐलडॉस पॉल आणि अब्दुला अबुबकर यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलं आहे. विशेष म्हणजे भारताचा आणखी एक अॅथलीट प्रविण हा चौथ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे तिनही पदकं जिंकण्याची भारताची सुवर्णसंधी थोडक्यात हुकली.


भारताच्या पॉल आणि अब्दुला या दोघांनी अप्रतिम असा प्रयत्न यावेळी केल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये ऐलडॉस पॉलने तब्बल 17.3 मीटर इतकी ट्रिपल जम्प करत सुवर्णपदक मिळवलं. तर अब्दुलाने पाचव्या प्रयत्तान 17.2 मीटर उडी घेत दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक जिंकलं आहे. तर बर्म्युडा देशाच्या पेरान चीफला 16.92 मीटर उडीसह कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.




सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय


यावेळी भारताच्या ऐलडॉस पॉल याने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यामुळे महान धावपटू मिल्खा सिंह आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यानंतर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ऐलडॉस पहिला भारतीय ठरला आहे.


भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू


सुवर्णपदक-16: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, अल्धौस पॉल. 


रौप्यपदक-12: संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर. 


कांस्यपदक- 19: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी. 


हे देखील वाचा-