FIH Womens Hockey World Cup 2022 : सध्या सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय (India) संघ अजूनही विजय मिळवू शकलेला नाही. आज (मंगळवार) पूल बीमध्ये चीनविरुद्धचा (China) भारतीय संघाचा सामना अनिर्णित सुटला. याआधी भारतीय संघचा इंग्लंडविरुद्धचा सामनाही 2-2 अशाप्रकारे अनिर्णित सुटला होता. आता भारतीय संघाला आपला पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.



टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेला भारतीय महिला संघ (India) थोडक्यात पदक मिळवण्यापासून हुकला होता. त्यामुळे आता महिला हॉकी विश्वचषकात तरी भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. पण आज झालेला चीन विरुद्धचा सामना अनिर्णित सुटला. यावेळी चीनच्या (China) झेंग जियाली  हिने 26 व्या मिनिटाला गोल केला. भारतीय संघाकडून बरेच प्रयत्न झाले पण गोल मात्र करता येत नव्हता.


वंदना कटारियाने केला एकमेव गोल


अखेर सामन्याच्या 45 व्या मिनिटाला भारताची आघाडीची महिला हॉकीपटू वंदना कटारिया (Vandana Katariya) हिने पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरच्या मदतीने एक दमदार गोल केलाय. ज्यामुळे सामन्यात भारत 1-1 च्या बरोबरीत आला. वंदनाने याआधी देखील इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण गोल केला होता. सामन्यात पहिल्या दोनही क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाचं बॉलवर नियंत्रण होतं. भारतीय संघाने बऱ्याच संधी तयार केल्या, पण या संधीला गोलमध्ये बदलता येत नव्हतं. दुसरीकडे चीन संघाकडून दमदार डिफेन्स दिसून येत होता.  दरम्यान 45 व्या मिनिटाला वंदनाच्या गोलने सामन्यात 1-1 असा स्कोर झाला. ज्यानंतर दोन्ही संघातील एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. ज्यामुळे अखेर सामना 1-1 अशा स्कोरने अनिर्णित सुटला.


हे देखील वाचा-