Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे


एकूण 420 जागांसाठी भरती होत आहे.


पहिली पोस्ट - वैद्यकीय अधिकारी


शैक्षणिक पात्रता - MBBS सह MCIM नोंदणी


एकूण जागा - 140


अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in



दुसरी पोस्ट - MPW (महिला/पुरुष)


शैक्षणिक पात्रता - B.Sc.नर्सिंग/ GNM सह नर्सिंग काऊंसिल नोंदणी


एकूण जागा - 140


अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in



तिसरी पोस्ट - MPW (पुरुष)


शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम


एकूण जागा - 140


नोकरीचं ठिकाण - ठाणे


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता - चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे


अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022


तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in



राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे


पोस्ट - वैद्यकीय अधिकारी


शैक्षणिक पात्रता - MBBS , MCI / MMC काऊंसिलकडील नोंदणी अनिवार्य


एकूण जागा - 12


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची अंतिम तारीख - 8 जुलै 2022


अर्ज पाठवण्याचा पत्ता- मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, NHM विभाग, काऊंसिल हॉल समोर, पुणे-1


तपशील - arogya.maharashtra.gov.in



मुंबई पोर्ट ट्रस्ट


पोस्ट - प्रशिक्षणार्थी कायदेशीर (ट्रेनी लीगल)


शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी, किमान अनुभव


एकूण जागा - 18


वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्यासाठीचा पत्ता - सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑगस्ट 2022


तपशील - mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement यावर क्लिक करा. Engagement of Trainee (Legal) on contract basis in Mumbai Port Authority या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)