एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दक्षिण आफ्रिकेला धक्का, दुसऱ्या वन डेतून फाफ डू प्लेसिस 'आऊट'
दुसरी वन डे जिंकून ही आघाडी वाढवण्याचा विराटच्या भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
सेन्चुरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा वन डे सामना आज सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. डर्बनची पहिली वन डे जिंकून सहा सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरी वन डे जिंकून ही आघाडी वाढवण्याचा विराटच्या भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे या मालिकेदरम्यान यजमान संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी एबी डिव्हिलियर्सला बोटाच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
फाफ डू प्लेसिसच्या ऐवजी दक्षिण आफ्रिका संघाची धुरा एडिन मार्करमच्या खांद्यावर असेल, तर फरहान बेहरदीनला संघात स्थान देण्यात आलं आहे. शिवाय डिव्हिलियर्सच्या जागी हेइनरिक क्लासेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धुरा आता हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांच्या खांद्यावर असेल.
संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : एडिन मार्कराम (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जेपी ड्यूमिनी, फरहान बेहरदीन, इमरान ताहिर, हेइनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एनगिडी, आंदिले फेहुलकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिह्ले जोंडो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement