एक्स्प्लोर

'भारताच्या प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड योग्य'

नवी दिल्ली : राहुल द्रविड भारताच्या प्रशिक्षकपदासाठी योग्य असून त्याच्यामध्ये प्रशिक्षकाची पात्रता आहे, असं मत ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू शेन वॉट्सनने व्यक्त केलं आहे.     द्रविडच्या पात्रतेवर अगोदरपासूनच कसलीही शंका नाही. द्रविडने राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. त्या काळात मलाही द्रविडसोबत काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, अशा शब्दात वॉट्सनने प्रशिक्षकपदासाठी द्रविडचं समर्थन केलं आहे.     द्रविडमध्ये युवा खेळाडू घडवण्याची क्षमता द्रविडकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची धुरा दिल्यास ती जबाबदारी तो नक्कीच यशस्वीपणे सांभाळेल यात कसलीही शंका नाही. आयपीएलमधून कर्णधार म्हणून समोर आलेला विराट कोहली आणि द्रविड दोघे मिळून संघासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरतील. द्रविड एक व्यक्ती म्हणून देखील अत्यंत चांगला आहे. द्रविडमध्ये युवा खेळाडूंना समजून मार्गदर्शन करण्याची कला आहे, असं वॉट्सनने सांगितलं.     भारताचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. पण शास्त्री यांचाही कार्यकाळ संपल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.     'प्रशिक्षकपदासाठी द्रविडच योग्य' अंडर-19 भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे द्रविडसाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी समर्थन केलं आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, हरभजन सिंह यांच्यासह अनेकांनी द्रविडच्या नावाचं समर्थन केलं आहे.     भारतीय संघ लवकरच अनेक महत्त्वाच्या दौऱ्यांवर जाणार आहे. डिसेंबर 2016 पर्यंत भारत वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि इग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget