राहुल गांधी यांनी ट्विट करत मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले, "डिएगो मॅराडोना हे एक जादूगार होते. ज्यांनी फुटबॉल खेळ अप्रतिम बनवला होता. त्यांच्या कुटुंबियांना,चाहत्यांना माझं प्रेम आणि संवेदना."
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी एक ट्वीट केलं आहे. सचिन म्हणाला , "क्रीडा आणि फुटबॉल जगतातील एका महान खेळाडूला आज आपण गमावले आहे. रेस्ट इन पीस मॅराडोना! तुमची कायम आठवण येईल".
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही मॅराडोना यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. मॅराडोना यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे.त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!'
30 ऑक्टोबरला केला होता 60 वा वाढदिवस
30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.