Dhruv Jurel and Sarfaraz Khan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी नवीन वार्षिक करार जारी केला आहे. यावेळी बीसीसीआयने आपल्या कराराचा भाग म्हणून 40 खेळाडू ठेवले आहेत. 40 खेळाडूंची चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्व खेळाडू A+, A, B आणि c श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. मात्र, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारात स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडू बराच वेळ बोर्डाच्या टार्गेटवर होते. मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत नाव कमावणारे युवा ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनाही केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही. तथापि, या मागे एक मनोरंजक कारण आहे. 






जुरेल आणि सरफराज यांना स्थान का मिळाले नाही?


वास्तविक, केंद्रीय करार जारी करताना बीसीसीआयने आणखी एक गोष्ट सांगितली आहे. कोणताही खेळाडू विशिष्ट कालावधीत भारतासाठी 3 कसोटी, 8 एकदिवसीय किंवा 10 T20 खेळेल. त्याला प्रो-रटा आधारावर ग्रेड सी श्रेणीमध्ये आपोआप समाविष्ट केले जाईल. मीडिया ॲडव्हायझरी जारी करताना, बीसीसीआयने म्हटले आहे की, 'जे खेळाडू विशिष्ट कालावधीत किमान 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 खेळण्याचे निकष पूर्ण करतात त्यांना प्रो-रेटा आधारावर ग्रेड C मध्ये स्वयंचलितपणे समाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान, ज्यांनी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत, ते दोघेही इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना खेळल्यास सी श्रेणीत समाविष्ट होतील.






युझवेंद्र चहलची सुद्धा सुट्टी 


भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून मुक्त करण्यात आले आहे. चहलही बऱ्याच काळापासून भारतीय संघापासून दूर आहे. चहलने भारतीय संघासाठी 72 वनडे आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 121 आणि टी-20 मध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या