VBA and Manoj Jarange : महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महत्वाची बैठक आज (दि. 28) सुरु आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे 4 मोठ्या मागण्या केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्राद्वारे या 4 मागण्या केल्या आहेत. 


काय आहेत वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या?


महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना मविआचा उमेदवार म्हणून घोषित करावे. मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी तर 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा 4 प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत. 


भाजपसोबत जाणार नाहीत, असे वचन द्या 


शिवाय, वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aaghadi) कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. मविआच्या प्रत्येक घटकानं लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणूकीपूर्वी आणि नंतर भाजपात सामील होणार नाही, असा प्रस्ताव वंचितकडून (Vanchit Bahujan Aaghadi) देण्यात आलाय. 


वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव सादर 


आम्ही २७ जागांसाठी यादी दिली. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआ मध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. 12-12-12-12च्या फॉर्म्युल्यासाठी आम्ही आग्रही नव्हतो.ज्या दिवशी पवार साहेब ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर देखील येतील, असं धैर्यवान पुंडकर म्हणाले आहेत.  


महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते आज एकत्र जमले होतो. कोणी कोठून लढायचे यावर आमचे एकमत आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) काही प्रतिनिधी आज हजर होते. वंचितचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद सुरु आहे. देशात हुकूमशाही आणि संविधानाच्या विरोधात मोदींनी मोर्चा सुरु केलाय. त्याच्याविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आमच्यासोबत आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Anil Parab : 'हिंदू डॉन'ही कोणती संकल्पना आणली? तुम्हाला आता हिंदू डॉन कशाला पाहिजेत? अनिल परब यांचा भाजपला सवाल