एक्स्प्लोर

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी धोनीला सक्त ताकीद

पुणे : आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रायझिंग पुणे सुपरजायंटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामनाधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. रायझिंग पुणे आणि मुंबई इंडियन्स संघांमधल्या सामन्यादरम्यान धोनीकडून आयपीएल आचारसंहितेचा भंग करण्याचा लेव्हल वनचा गुन्हा घडल्याचं सांगून, या प्रकरणात त्याला सामनाधिकारी मनू नय्यर यांनी ताकीद दिल्याचं आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या प्रकरणात धोनीकडून नेमकी काय आगळीक घडली, त्याचं स्पष्टीकरण मात्र प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेलं नाही. मात्र इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मुंबईचा कायरन पोलार्ड पायचीत असल्याचं अपील पंचांनी फेटाळल्यानंतर, धोनीने पंचांकडे पाहून डीआरएसचा कौल घेण्याची खूण केली होती. आयपीएलमध्ये डीआरएसचा समावेश नाही. त्यामुळे धोनीने केवळ गंमतीनंच डीआरएसचा कौल घेण्याची खूण केली होती. पण पंचांच्या निर्णयाबाबत गंमतही सहन केली जाणार नाही, हाच इशारा सामनाधिकाऱ्यांनी धोनीला दिलेला दिसतो. आयपीएलच्या दहाव्या मोसमातील दुसरा सामना काल पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने कर्णधारास साजेशी खेळी करून आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटला मुंबई इंडियन्सवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. गहुंजे स्टेडियमवरच्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 54 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली. त्यानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची, बेन स्टोक्सच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची आणि धोनीच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 44 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी, हार्दिक पंड्यानं अवघ्या 15 चेंडूंत फटकावलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणेला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. रायझिंग पुणेनं एक चेंडू आणि सात विकेट्स राखून ते आव्हान पार केलं. पुण्याच्या या विजयात लेग स्पिनर इम्रान ताहिरनंही मोलाची भूमिका बजावली. त्यानं 28 धावांच मुंबईच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं 65 धावांची खेळी करून पुण्याच्या विजयाचा पाया रचला.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ: वैभवला बाहेर बसवून ईशान किशनला खेळवलं, गंभीर अय्यरनं टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला, टीम इंडियाच्या पराभवाची कारणं....  
वैभवला बाहेर काढून ईशानला खेळवलं पण त्याला खातंही उघडता आलं नाही, गंभीर-अय्यरचा डाव फसला, भारताचा पराभव कशामुळं? 
IND vs NZ 4th T20 : फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
IND vs NZ 4th T20 : न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget