Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ (India Women's Hockey Team) सातत्यानं दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घानाला धुळ चाखल्यानंतर भारतीय महिला संघानं वॉल्सचाही पराभव केलाय. वॉल्सविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा पुढचा सामना इंग्लंडशी (2 ऑगस्ट) खेळणार आहे.
या स्पर्धेतील पहिल्या सत्रात भारतीय महिला संघानं 2 दोन करत सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या अखेरिस वॉल्सनं गोल करत सामन्यात पुनरागमन केलं. मात्र, अखेरच्या सत्रात भारतानं चांगला खेळ दाखवत सामन्यावर कब्जा केला.
पहिल्या सामन्यात घनाला 5-0 नं नमवलं
भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी घानाचा 5-0 असा पराभव करून कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं त्यांच्या पहिल्या सामन्यात दमदार प्रदर्शन करून दाखवलं. भारताकडून गुरजित कौर (3, 39 वा मि.), नेहा गोयल (28 वा मि.), संगीता कुमारी (36 वा मि.) आणि सलीमा टेटेनं (56 वा मि.) आपल्या आक्रमक खेळीतून भारतीय महिला हॉकी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
नवज्योत कौरच्या गैरहजरीत भारताची धडाकेबाज कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाला शनिवारी मोठा धक्का बसला. स्टार मिडफिल्डर नवज्योत कौरचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तिनं भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय. कौर गेल्या दोन दिवसांपासून आयसोलेशनमध्ये होती आणि भारत विरुद्ध घाना सामन्यातही ती खेळली नव्हती
हे देखील वाचा-
- Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर
- Sanket Sargar wins silver medal : स्पॉंडिलायसिससारख्या गंभीर दुखापतीशी झुंज, वयाच्या 21 व्या वर्षी रौप्य पदकाला गवसणी
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाला धक्का, नवज्योत कौरला कोरोनाची लागण