Commonwealth Games 2022: भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 8 विकेट्सनं (India Beats Pakisthan) पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं.


भारत-पाकिस्तान सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे-


- नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.


- भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ डगमगताना दिसला.


- पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीनं सर्वाधिक 32 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही.


- पावसामुळं 18 षटकाचा खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानं भारतासमोर सर्वबाद 100 धावांचं लक्ष्य ठेवलं.


- भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, रेणुका सिंह आणि मेघना सिंह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.


- पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात झाली. 


- सलामीवीर स्मृती मानधना (नाबाद 63) आणि शेफाली वर्मानं (16 धावा) सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. 


- दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागेदारी झाली. त्यानंतर सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शेफाली आऊट झाली.


- मात्र, स्मृतीनं दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळी सुरु ठेवत भारताला विजय मिळवून दिला. 


- पाकिस्तानकडून तुबा हसन आणि ओमैमा सोहेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हे देखील वाचा-