लातूर : शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोगलगाई संदर्भात काय निर्णय घ्यावा याचा कुठेही उल्लेख नाही. हे सगळं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभाग, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याबाबत त्यांच्याशी बोलूया, असे आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लातूरच्या जनतेला दिले आहे. अजित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूरला भेट दिली.
बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शंखी गोगलगाई प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी गोगलगाई मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये कुठेही शंखी गोगलगाईबद्दल नियम आणि अटींबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. परंतु, या प्रश्नावर मार्ग काढावा आणि तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांन केली आहे.
"महाराष्ट्राची संस्कृती, परंपरात चांगले झाले तर पायगुण चांगला म्हणतात. मात्र वाईट झाले तर पायगुण वाईट म्हणतात. असे आमच्या शेतकऱ्यांचे झाले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यात जे सरकार अस्तित्त्वात आले. त्यात दोघेच राज्याचे नेतृत्त्व करत आहेत" असा टोला अजित पवार यांनी बीडमध्ये लगावला. अजित पवार यांनी आज बीडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची देखील भेट घतेली. त्यानंतर त्यांनी लातूरच्या जनतेशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या