Hardeek Joshi In Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. "मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय, लवकरच...आपल्या कलर्स मराठीवर" असं म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर करण्यात आला. आता या कार्यक्रमात 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 


बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षकांना या पर्वात कोण सहभागी होणार याची उत्सुकता लागली आहे. आता चौथ्या पर्वातील स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी अर्थात हार्दिक जोशी  बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 


हार्दिक जोशीचं नाव चर्चेत


हार्दिक जोशीला बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी संपर्क साधण्यात आला आहे. पण अद्याप त्याने काहीही उत्तर दिलेलं नाही. हार्दिक सध्या 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच लवकरच तो अक्षय देवधरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. 


'बिग बॉस मराठी 4' या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. आता पुन्हा एकदा स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील 100 दिवसांचा प्रवास सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीचं घर टास्क आणि वादामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतं. 'बिग बॉस मराठी 4' कोण होस्ट करणार हे अद्याप समोर आलेलं नाही. बिग बॉस मराठीचे तीन सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. बिग बॉस संबंधित प्रत्येक अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण आता चौथ्या सीझनचा प्रोमो त्यांनी शेअर केलेला नाही. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला


Bigg boss marathi season 3 winner : विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन 3' चा महाविजेता, दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा