एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण
महिलांच्या 69 किलो वजनी गटात पूनम यादवने 222 किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. वेटलिफ्टर पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. महिलांच्या 69 किलो वजनी गटात पूनमने सुवर्णमयी कामगिरी बजावली.
पूनम यादवने 222 किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्नॅचमध्ये 100 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 122 किलो वजन उचललं.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे सातवं पदक ठरलं आहे. ही सातही पदकं वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडलं, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला.
दुसऱ्या दिवशी संजिता चानूने भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवत विश्वविक्रम रचला होता. तर अवघ्या 18 वर्षांचा वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर घातली होती.
तिसऱ्या दिवशी सतीश शिवलिंगम आणि आर वेंकट राहुल यांनी सुवर्णपदक पटकावून भारतीयांची मान उंचावत ठेवली. त्यानंतर चौथ्या दिवसाची सुरुवात पूनम यादवच्या सुवर्णमयी कामगिरीने झाली.
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी
वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक.
संबंधित बातम्या :
CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement