एक्स्प्लोर

FIFA : भल्याभल्यांचा अंदाज चुकवणाऱ्या क्रोएशियाच्या यशाचं गमक काय?

एवढ्या तरुण देशाने जेमतेम 41-42 लाखांच्या लोकसंख्येतून फुटबॉलची चॅम्पियन टीम घडवावी, ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. क्रोएशियाच्या या यशाचं नेमकं गमक काय, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...

मुंबई : ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियाने भल्याभल्यांचा अंदाज चुकवून फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची फायनल गाठण्याची क्रोएशियाची ही पहिलीच वेळ आहे. जगाच्या नकाशावर क्रोएशियाचं अस्तित्व निर्माण होऊन आज केवळ 27 वर्षे झाली आहेत. एवढ्या तरुण देशाने जेमतेम 41-42 लाखांच्या लोकसंख्येतून फुटबॉलची चॅम्पियन टीम घडवावी, ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. क्रोएशियाच्या या यशाचं नेमकं गमक काय, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून... रशियातल्या मॉस्कोच्या रणांगणात क्रोएशियाने खरोखरच कमाल केली. ल्युका मॉडरिचच्या या फौजेने हॉट फेव्हरिट इंग्लंडचं आव्हान 2-1 असं उधळून लावलं आणि वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट बुक केलं. धक्का बसला ना? पण होय, क्रोएशियाचं वय 27 वर्षेच आहे. वास्तविक, मूळच्या युगोस्लाव्हियातही क्रोएशियाचं अस्तित्त्व होतं. पण युगोस्लाव्हियाचं विघटन होऊन रिपब्लिक ऑफ क्रोएशिया राष्ट्राची स्वतंत्र निर्मिती झाली ती 1991 साली. त्याआधी मूळचा युगोस्लाव्हियाच फिफा विश्वचषकात सहभागी होत होता. क्रोएशियाच्या निर्मितीनंतर तो देश 1994 सालच्या पहिल्या विश्वचषकात सहभागी झाला नाही. पण 1998 साली क्रोएशियाने पहिल्याच फटक्यात विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. पण फ्रान्सकडून झालेल्या 2-1 अशा पराभवाने क्रोएशियाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं. मग क्रोएशियाने हॉलंडवर 2-1 अशी मात करून 1998 सालच्या विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला. आज 20 वर्षांनी विश्वचषकाच्या व्यासपीठावर पुन्हा बोलबाला आहे तो क्रोएशियाचा. झ्लाटको डॅलिच गुरुजींच्या पठ्ठ्यांचा... म्हणजेच ल्युका मॉडरिचच्या फौजेचा. जर्मनी, अर्जेंटिना, ब्राझिल आणि स्पेनसारख्या संभाव्य विजेत्यांवर उपांत्य फेरीआधीच पराभूत होण्याची वेळ आलेली असताना क्रोएशियाने मात्र थेट फायनलमध्ये धडक मारावी याचं साऱ्या फुटबॉलविश्वाला राहून राहून नवल वाटत आहे. तुम्हा-आम्हाला प्रश्न पडला आहे की, क्रोएशियाच्या या यशाचं गमक आहे तरी काय? पण खरं तर या प्रश्नाचं उत्तर क्रोएशियातही कुणाकडे नाही. क्रोएशियाची लोकसंख्या अंदाजे 41-42 लाखांच्या घरात, म्हणजे आपल्या मुंबईच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश आहे. क्रोएशियाचं क्षेत्रफळ हे 56594 चौरस मीटर्स भरतं. याचा अर्थ 307713 चौरस मीटर्सच्या महाराष्ट्रात अंदाजे पाच क्रोएशिया सहज बसू शकतील. एवढ्या चिमुकल्या भूभागातून फुटबॉलची एक चॅम्पियन टीम उभी राहते, याचं कौतुक करायलाच हवं. क्रोएशिया 1998 सालापासून सहापैकी पाच विश्वचषकांसाठी पात्र ठरला आहे. या सातत्यपूर्ण यशामागे एखादा फॉर्म्युला आहे का, या प्रश्नावर क्रोएशियाच्या फुटबॉल डेव्हलपमेन्टचे माजी प्रमुख रोमियो जोझाक यांच्याकडेही उत्तर नाही. त्यामुळे इतिहासावर नजर टाकायची झाली तर, क्रोएशियाला फुटबॉलची गोल्डन जनरेशन लाभली ती मूळच्या युगोस्लाव्हियाकडून. 1987 साली युगोस्लाव्हियाने चिलीत अंडर ट्वेन्टी वयोगटाचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. युगोस्लाव्हियाची ही तरुण पिढी भविष्यात खूप मोठा पराक्रम गाजवेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता. पण चारच वर्षांत म्हणजे 1991 साली सुरू झालेल्या बाल्कन युद्धात युगोस्लाव्हियाचं अस्तित्वच संपून गेलं. पण चिलीतल्या गोल्डन जनरेशनमधून क्रोएशियाला रॉबर्ट जार्नी, झ्वोनिमिर बोबान, डावोर शुकेर, इगोर स्टिमाच आणि रॉबर्ट प्रोसिनेकी या गुणवान खेळाडूंची देणगी मिळाली. त्याच शिलेदारांनी पहिल्यांदाच क्रोएशियाची जर्सी परिधान करून, 1998 साली क्रोएशियाला विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवून दिला. त्यानंतर गेल्या 20 वर्षांत एखाद्या फुटबॉल राष्ट्राला साजेशी अशी अॅकॅडमी सिस्टिम क्रोएशियात तयार झालेली नाही. क्रोएशियातल्या फुटबॉलच्या पायाभूत सुविधा खूप ग्रेट आहेत असंही नाही. त्यांच्या युवा विकास कार्यक्रमात फुटबॉलविषयक धोरण नाही. या परिस्थितीत क्रोएशियासाठी आशेचा किरण ठरली ती तिथल्या लहानथोरांची फुटबॉलसाठीची समर्पित वृत्ती, आनुवंशिक शरीरयष्टी, प्रखर राष्ट्राभिमान आणि 1998 सालच्या यशाने दिलेली प्रेरणा. क्रोएशियातल्या डायनॅमो झॅगरेब अॅकॅडमीने ल्युका मॉडरिच, डेआन लॉवरेन, शिमे वरसालको, मारियो मानझुकिच आणि माटेओ कोवाचिच यांच्यासारखे गुणवान खेळाडू डझनाने घडवले. हीच मुलं आज मोठी होऊन रशियातल्या फिफा विश्वचषकात क्रोएशियाचा झेंडा डौलाने फडकावा म्हणून चिकाटीने संघर्ष करत आहेत. त्याच चिकाटीने, त्याच संघर्षाने क्रोएशियाला फिफा विश्वचषकाच्या फायनलचं दार उघडून दिलं आहे. संबंधित बातम्या : FIFA : गोवेकर आणि क्रोएशियाचं कनेक्शन काय? स्पेशल रिपोर्ट : फ्रान्सला ‘बीस साल बाद’ विश्वविजेता बनण्याची संधी!

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget