एक्स्प्लोर
फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाव विमानतळाला
लिस्बन : पोर्तुगालचा फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची क्रेझ जगभरातल्या चाहत्यांमध्ये आहे. साहजिकच त्याचं मूळगाव असलेल्या मदिराला रोनाल्डोचा अभिमान वाटतो. याच प्रेमातून विमानतळालाही ख्रिस्तियानोचं नाव देण्यात आलं आहे.
आतापर्यंत पोर्तुगालमधल्या मदिरा बेटावर रोनाल्डोचा पुतळा, संग्रहालय आणि हॉटेल आहे. त्यात एका विमानतळाचीही भर पडली आहे. मदिरा आंतरराष्ट्रीय विमानतळ आता रोनाल्डोच्या नावाने ओळखलं जाणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
रोनाल्डोने त्याच्या प्रायव्हेट जेटमधून ट्वीट करत या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
https://twitter.com/Cristiano/status/756829905501949952
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement