Football News : फुटबॉल फॅन्सनी नुकताच फिफा विश्वचषकाचा (Fifa World Cup 2022) थरार अनुभवला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असणाऱ्या अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला. पण तेव्हाच रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कर्णधार असणारा पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर गेल्यानं अनेक फुटबॉलप्रेमींची निराशाही झाली. पण आता हे दोन्ही दिग्गज म्हणजेच लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. सौदी अरेबियातील रियाध शहरात फुटबॉल विश्वातील या दोन दिग्गजांमध्ये टक्कर होणार आहे. मेस्सी असणाऱ्या पॅरिस सेंट जर्मन (PSG) फुटबॉल क्लब या आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान तो रियाद 11 विरुद्ध सामना खेळणार आहे. यावेळी रियाद 11 संघात सौदीतील दमदार खेळाडू मैदानात उतरतील. यांचं नेतृत्त्व रोनाल्डो करणार आहे. ज्यामुळे या सामन्यात हे रोनाल्डो-मेस्सी हे दोन्ही दिग्गज आमनेसामने असतील.


लिओनेल मेस्सी हा फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळतो. त्याच वेळी, रोनाल्डोने युरोपियन फुटबॉलसोडून सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रियाद शहरातील अल नसर आणि अल हिलाल या क्लबमधील खेळाडू मिळून 'रियाद ST 11' या संयुक्त संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो पीएसजीविरुद्ध या संघाचे नेतृत्व करणार आहे.


तिकिटांसाठी 20 लाख जण प्रतिक्षेत


19 जानेवारी अर्थात गुरुवारी हा सामना रियाद येथे होणार आहे. या भव्य सामन्यासाठी ऑनलाइन 20 लाख तिकीट विनंत्या आल्या होत्या. या सामन्याच्या व्हीआयपी तिकिटांच्या (VIP Tickets) लिलावाची किंमत धक्कादायक होती. मंगळवारी झालेल्या लिलावात (Auction For Tickets) या सामन्याची VIP तिकिटं $2.66 दशलक्षमध्ये विकली गेली. रोनाल्डो आणि मेस्सी (Ronaldo and Messi) यांच्यात गेल्या दशकभरापासून सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्यासाठी (Greates of All time) युद्ध सुरू आहे. हे दोन्ही खेळाडू आळीपाळीने बलॉन डी'ओर हा मानाचा पुरस्कार जिंकत आले आहेत. हे दोन्ही खेळाडू यापूर्वी स्पेनच्या ला लीगामध्ये एकमेंकाविरुद्ध खेळले होते, जिथे मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले होते आणि रोनाल्डोने रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व केले होते. अशा परिस्थितीत या दोन खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. पण मागील बराच काळ ते आमने-सामने आले असून आता मात्र ते एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.


हे देखील वाचा-