Taliban Unveil Indigenously Built Supercar: हिंसाचार आणि फतव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा अफगाणिस्तान पुन्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अफगाणिस्तानमध्ये एका सुपरकारची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर देखील या कारची खूप चर्चा होत असून याचे फोटो व्हायरल झाले आहे. तालिबान शासित अफगाणिस्तानात इंजिनीअर्सनी पहिल्यांदाच एका सुपरकारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव MADA-9 असे ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरकार तयार करण्यासाठी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ENTOP आणि अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्यूटच्या (ATVI) किमान 30  इंजिनीअर्सने मेहनत घेत ही कार विकसित केली आहे. 


Taliban Unveil Indigenously Built Supercar: तालिबान राजवटीत बनलेली पहिली 'सुपरकार'


तालिबानच्या राजवटीत बनलेली ही पहिली सुपरकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरकार तयार करण्यासाठी आतापर्यंत 40 ते 50 हजार डॉलर्स खर्च आला आहेत. ही स्पोर्ट्स कार स्थानिक पातळीवर विकसित केली गेली आहे. सध्या तिच्या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये अजून काम करणे बाकी आहे. कॉन्सेप्ट मॉडेलमुळे याही अधिक माहिती समोर येऊ शकलेली नाही आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या सुपरकारमध्ये टोयोटा कोरोलाचे फोर-सिलेंडर, 1.8-लिटर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन सुपरकारसारखे पॉवरफुल नसले तरी अफगाणिस्तानच्या कार इंजिनीअर्सचे हे मोठे यश असल्याचे सांगितले जाते. या कारचे काही फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.






तालिबानचा उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने स्वतः या कारचे अनावरण केले आहे. अफगाणिस्तानचा संयुक्त राष्ट्र (UN) मधील राजदूत सुहेल शाहीन यानी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या कारचा व्हिडीओ शेअर केला असून त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "अफगाणच्या तरुणांनी अफगाणिस्तानच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे."


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:


Ratan Tata: 'इंडिका'ला 25 वर्ष पूर्ण! 'माझ्या हृदयात तुझ्यासाठी आजही आहे खास जागा', रतन टाटांनी शेअर केली भावनिक पोस्ट


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI