Cristiano Ronaldo Net Worth: जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि AlNassr यांच्यातील कराराकडे क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत फुटबॉलसारख्या खेळासमोर क्रिकेट कुठेही टिकत नाही, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.


Cristiano Ronaldo Net Worth: रोनाल्डो खेळण्यासाठी दरवर्षी मिळणार 1800 कोटी रुपये


सौदी अरेबियाच्या AlNassr  क्लबच्या वतीने खेळण्यासाठी रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) दरवर्षी 1800 कोटी रुपये मिळतील. पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूला इतके पैसे कमवण्यासाठी जवळपास 150 वर्षे क्रिकेट खेळावे लागणार आहे. या आकडेवारीवरून हे दिसते की, क्रिकेट जगभर कितीही लोकप्रिय झाले असले तरी फुटबॉलच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.


Rohit Sharma Net Worth: रोहित शर्माने आयपीएलचे 15 सीझन खेळून 178 कोटी रुपये कमावले


रोहित शर्मा (Rohit Sharma), धोनी, विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सिजनपासून यात खेळत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) कमाई करण्यात आघाडीवर आहे. रोहित शर्माने आयपीएलचे 15 सीझन खेळून 178 कोटी रुपये कमावले आहेत. त्याची सरासरी काढली तर रोहित शर्मा आयपीएल खेळून दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपये कमावतो. त्यामुळे 1800 कोटी रुपये कमवण्यासाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) 150 वर्षे आयपीएल खेळावे लागणार आहे. इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर धोनीने आयपीएलचे 15 सीझन खेळून 176 कोटी रुपये कमावले आहेत. तर विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलचे 15 सीझन खेळून 173 कोटींची कमाई केली आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएलमधून 109 कोटींची कमाई केली आहे. आयपीएलमधून 100 कोटींहून अधिक कमाई करणारे केवळ सात खेळाडू आहेत.


यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि मेस्सी सारखे खेळाडू एका वर्षात क्लबशी करार करून जितके कमावतात, तितकी कमाई कोणताही क्रिकेटपटू त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत करू शकत नाही. आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूची कमाई फक्त 18 कोटी रुपये आहे. रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका वर्षाच्या कमाईची बरोबरी करण्यासाठी त्या खेळाडूला 100 वर्षे आयपीएल खेळावे लागेल.