Cristiano Ronaldo Car Accident: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली. रोनाल्डोचा एक कर्मचारी ही कार चालवत होता. परंतु, कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामुळं कारचं मोठं नुकसान झालंय. महत्वाचं म्हणजे, कार चालकाला कोणतीही दुखापत न झाल्याचं समजत आहे. 


मँचेस्टर युनायटेडचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला अलिशान कारची खूप आवड आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असल्यानं रोनाल्डोकडे अनेक आलिशान कार आहेत. यापैकी एका कारमध्ये बुगाटी वेरॉनचाही समावेश आहे. ज्या कारचा अपघात झालाय. माहितीनुसार, या कारला सोमवारी सकाळी स्पॅनिश शहरातील माजोर्का येथील एका घराच्या एंट्री गेटसमोर अपघात झालाय.


ट्वीट-



बुगाटी वेरॉनची किंमत जवळपास 16.25 कोटी
या कारला जेव्हा अपघात झाला, ख्रिस्तियानो रोनाल्डो कारमध्ये उपस्थित नव्हता. या  बुगाटी वेरॉनची किंमत जवळपास 16.25 कोटी रुपये आहे. रियल माद्रिदचा माजी फॉरवर्ड ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबासह स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे. या महिन्याच्या अखेरीस मँचेस्टर युनायटेडचा प्री-सीझन सुरू होण्यापूर्वी तो युनायटेड किंगडमला परतेल.


ख्रिस्तियानो रोनाल्डोची उत्कृष्ट कामगिरी
पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रोफेशनल फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. रोनाल्डोनं यावर्षी जोसेफ बीकनला (805 गोल) मागं टाकलं होतं. ज्यानं फिफा रेकॉर्डनुसार एकूण 805 गोल केले होते. एवढेच नाही तर. रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.


हे देखील वाचा-