Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नवजात मुलाचे निधन झाले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोनं याबाबत काल (18 एप्रिल) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. 


रोनाल्डोची पोस्ट


रोनाल्डोनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे कोणत्याही आई-वडिलांसाठी सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीचा जन्म हा आम्हाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देतो. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो ज्यांनी आमची मदत केली.' प्रसूतीच्या वेळी रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे. ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोनं जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते दोघे लवकरच आई- बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती.






 रोनाल्डोनं जुळ्या मुलांबाबात पोस्ट शेअर करून एक खास फोटो चहत्यांसोबत शेअर केला होता.  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यानं लिहिले होते की, "आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहे." रोनाल्डोला  11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. 


हे देखील वाचा-