India tour of Zimbabwe: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला येत्या 18 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. झिम्बाब्वेनं सलग तीन मालिका जिंकून इतिहास गवसणी घातलीय.

झिम्बाब्वेचा सलग तीन मालिकेत विजयझिम्बाब्वेनं पहिल्यांदाच सलग तीन मालिका जिंकल्या आहेत. ज्यात दोन टी-20 आणि एका एकदिवसीय मालिकेचा समावेश आहे. झिम्बाब्वेनं प्रथम टी-20  वर्ल्डकप क्वालिफायर मालिका जिंकली होती. त्यानंतर बांग्लादेशला टी-20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका पराभूत केलंय. 

सिंकदर रजाचा जबरदस्त फॉर्मया तिन्ही मालिकेत झिम्बाब्वेचा स्टार ऑलराऊंडर सिंकदर रजानं दमदार कामगिरी करून दाखवली. त्यानं टी-20 वर्ल्डकप क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध 8 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर बांग्लदेशविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत त्यानं मालिकावीरचा खिताब जिंकला होता. बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 2 विकेट्स घेऊन 127 धावा केल्या. तर, एकदिवसीय मालिकेत पाच विकेट्स घेऊन 252 धावा केल्या. 

झिम्बाब्वेच्या अखेरच्या तीन मालिकेतील विजय1) टी-20 क्वालिफायर फायनल- नेदरलँडला 37 धावांनी पराभूत केलं.2) बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 नं विजय3) बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-1 नं विजय

भारताचं झिम्बाब्वे दौऱ्यातील वेळापत्रकभारत आणि झिम्बाब्वे यांच्यात येत्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्ट 2022 रोजी खेळला जाईल. 

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

सहा वर्षानंतर भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरादरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बाब्वे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 

हे देखील वाचा-