Watch Video: श्रीलंकेनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ नेदरलँडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी पाकिस्तान कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका पाकिस्तानी पत्रकारानं बाबर आझम यांना वर्कलोडबाबत विचारलं. यावर बाबर आझमनं मी झालोय का? असं उत्तर देऊन पत्रकाराची बोलतीच बंद केलीय. बाबर आझमच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. 


बाबर आझम पत्रकारावर का भडकला?
बाबर आझम नेदरलँड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलवली. त्यावेळी एका पत्रकारानं त्यांना वर्कलोड मॅनेजमेंटबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बाबर म्हणाला की,"हे आमच्या फिटनेसवर अवलंबून आहे. जसा आमचा फिटनेस आहे, तसा आम्ही कधीच विचार केला नाही. तुम्हाला वाटतंय की, मी म्हातारा झालो की आमचा संघ म्हतारा झालाय? भार वाढत असेल तर त्यासाठी फिट राहावं लागणार आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत. 


व्हिडिओ- 



बाबर आझमचा जबरदस्त फॉर्म
बाबर आझम सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बाबर सध्या टी-20 आणि एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर, कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या 28 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशिया कप 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. आशिया चषकात आझमचा फॉर्म असाच सुरू राहिला तर, भारतीय संघासमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.


आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज डहानी आणि उस्मान कादिर.


आयसीसी टी-20 क्रमवारी
पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 818 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावर भारताचा सूर्यकुमार यादव 805 गुणांसह असून तिसऱ्या स्थानावर पुन्हा पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवान 794 गुणांसह आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम आणि पाचव्या स्थानावर इंग्लंडता डेविड मलान अनुक्रमे 792 आणि 731 गुणांसह विराजमान आहेत. सहाव्या ऑस्ट्रेलियाचा आरॉन फिंच 716 गुणांसह तर सातव्या आणि आठव्या स्थानावर श्रीलंकेचा पाथुम निसंका आणि न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे अनुक्रमे 661 आणि 655 गुणांसह आहेत. तर, नवव्या आणि दहाव्या स्थानी वेस्ट इंडीजचा निकोलस पूरन आणि न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील अनुक्रमे 644 आणि 638 गुणांसह विराजमान आहेत.


हे देखील वाचा-