Yuzvendra Chahal : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जातोय. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आज (दि.9) दुबईत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलाय. यावेळी तो एका मिस्ट्री गर्लसोबत बसलेला पाहायला मिळालाय. आर जे महवश ही त्याच्यासोबत सामना पाहण्यासाठी बसली असल्याची चर्चा सुरु आहे. सामन्यादरम्यान, युजवेंद्र चहलकडे कॅमेरा गेल्यानंतर त्याच्यासोबत मिस्ट्री गर्ल बसलेली पाहिल्यानंतर सर्व चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. चहलचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
युजवेंद्र चहल मिस्ट्री गर्लसोबत मैदानात दिसला
युजवेंद्र चहल आणि आर जे महवश यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये दोघेही एकाच अँगलने व्हिडीओ शेअर करताना दिसले आहेत. दोघांनीही शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऑल ऑन द लाईन असं लिहिलं आहे. धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झालेला असताना चहल मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाल्यानंतर धनश्रीचा इन्स्टाग्रावर धुमाकूळ
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि धनश्रीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं समोर आलं होतं. सध्या त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या मीडिया रिपोर्ट्समध्ये जोर धरत आहेत. दरम्यान, चहल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग नसला तरी संघाला पाठिंबा देण्यासाठी तो स्टेडियममध्ये पोहोचला आहे.
सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या चहलने धनश्रीसोबतचे आपले फोटो काढून टाकले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहलच्या या कृतीमुळेच धनश्री सोबत घटस्फोट झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरु झाल्या होत्या. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, चहल आणि धनश्रीने अनेक वेळा सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना संकेत दिले आहेत आणि त्यांच्या भावना स्पष्ट केल्या आहेत. धनश्री अनेक वेळा मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली आहे, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये चहलला दुसऱ्या मुलीसोबत असे पाहिल्यानंतर चाहत्यांनी नवे अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या