Kuldeep Yadav, IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला जातोय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 46.3 षटकानंतर न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावत 213 धावा केल्या आहेत. मात्र, आता सामन्यादरम्यान, कुलदीप यादवच्या अवसान घातकीपणाची चर्चा रंगलीये. सामन्यात नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..

कुलदीप यादवने RUN OUT करण्याची संधी सोडली 

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला सातत्याने धक्के देण्यात टीम इंडियाला यश मिळालंय. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या एकालाही मोठी खेळी करु दिलेली नाही. शिवाय कोणाला मोठी भागिदारी करण्यातही यश मिळालेलं नाही. मात्र, कुलदीप यादने सेमीफायनलमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती केलीये. फलंदाज धावा काढत असताना कुलदीप यादव स्टंपच्या मागे उभं राहायचं सोडून स्टंपपासून लांब उभा राहिलेला पाहायला मिळालंय. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजाला बाद करण्याची संधी टीम इंडियाने गमावली आहे. 

गेल्या सामन्यातही कुलदीप यादवने केली होती अशीच चूक 

विशेष म्हणजे ऑस्ट्रलियाविरुद्धच्या सामन्यातही कुलदीपने थ्रो मारलेला असताना स्टंपपासून दूर राहिला आणि त्याने चेंडू सोडून दिला होता. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने त्याला झाप झाप झापलं होतं. मात्र, गेल्या सामन्यातील चुकांमध्ये अजूनही त्याने सुधारणा केलेली नाही. फायनल सामना सुरु असताना कुलदीप यादवने अवसान घातकीपणा केलाय.  

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात आत्तापर्यंत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलीये. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी एक विकेट गमावलीये. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स पटाकावल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

IND vs NZ Final : सगळे दिसतात, पण उपकर्णधार कुठंय...? रोहित शर्मा शुभमन गिलवर संतापला, भर मैदानात नेमकं घडलं तरी काय?

Kuldeep Yadav Profile : कुलदीप यादव : रोहितसेनेच्या भात्यातील हुकुमी अस्त्र; भल्याभल्यांची फिरकी घेणारा डावखुरा गोलंदाज