एक्स्प्लोर

युवराज सिंहचा क्रिकेटला अलविदा, सिक्सर किंगच्या निवृत्तीने चाहते भावुक

युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

मुंबई : सिक्सर किंग आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत युवराज सिंहने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून आज निवृत्तीची घोषणा केली. 19 वर्षांची कारकीर्द आज संपुष्टात आली, हे सांगताना युवराज भावुक झाला होता. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले. "प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा क्षण येतो की, आता थांबवं. आई-वडिलांशी चर्चा करुनच निवृत्तीचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता," असं युवराजने यावेळी सांगितलं. निवृत्तीनंतर कॅन्सरग्रस्तांसाठीचं काम सुरुच ठेवणार असल्याचं युवराज म्हणाला. निवृत्तीनंतर काय करणार यावर युवराज म्हणाला की, "माझ्या आयुष्यातील मोठा काळ क्रिकेटला दिल्यानंतर आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी कॅन्सर रुग्णांसाठी काम आहे." आपल्या You We Can या फाऊंडेशन अंतर्गत देशभरातील कॅन्सर पीडितांसाठी कॅम्प आयोजित करणार, आजारी लोकांची मदत करणार असल्याचं युवराने सांगितलं. कॅन्सरवर मात युवराजने स्वत: कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकत कमबॅक केलं आहे. 2011 च्या विश्वषकानंतर त्याला कॅन्सर असल्याचं समोर आलं. यानंतर त्याने सुमारे दोन वर्ष कॅन्सरशी दोन हात केले आणि संघात पुनरागमन केलं. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर युवराज सिंहने आपल्या You We Can नावाच्या फाऊंडेशनची सुरुवात केली होती, ज्याअंतर्गत तो कॅन्सर पीडितांना मदद करतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8701 धावा युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. वनडे फॉरमॅटमध्ये युवराज सिंहचा सर्वाधिक धावसंख्या 150 धावा आहेत. कसोटीमध्ये 40 सामने वनडे शिवाय युवी कसोटी फॉरमॅटमध्ये 40 सामना खेळला आहे. कसोटीमध्ये युवराजने 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहे. त्याने तीन शतकं आणि 11 अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. ट्वेण्टी-20 स्पेशालिस्ट तर ट्वेण्टी-20 क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी 58 वेळा मैदानात उतरला आहे. टी-20 मध्ये युवराज सिंहने 1177 धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा 50 किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे. सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंहने साल 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा केला होता. 'सिक्सर किंग' युवराज युवराजने याच सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला 'सिक्सर किंग' ही नवी ओळख मिळाली. गोलंदाजीतही कमाल युवराज सिंहने भारतीय संघासाठी केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीत कमाल केली आहे. युवराजने भारतासाठी वनडेमध्ये 111 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये युवराजची सर्वोत्तम कामगिरी होती 31 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स. वनडेशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये युवराजने 9 आणि टी-20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणीतही दमदार कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही युवराजची कामगिरी दमदार होती. पंजाबसाठी युवराजने 139 प्रथम श्रेणी, 423 लिस्ट ए आणि 231 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्त्व केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युवराज सिंहने 8965 धावा केल्या आहे, ज्यात 36 अर्धशतकं आणि 26 शतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए मध्ये युवराज सिंहने 37.91 च्या सरासरीने 12663 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये युवराज सिंहच्या नावावर 78 अर्धशतकं आणि 19 शतकांची नोंद आहे. याशिवाय टी-20 मध्ये युवराजने 4857 धावा केल्या आहेत. पुनरागमनाचा अयशस्वी प्रयत्न युवराज यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु त्याला बऱ्याच सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारतीय संघात त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तर युवराजचं 2012 नंतर टीममध्ये कमबॅकच झालेलं नाही. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधील वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना त्याचा अखेरचा ठरला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget