India vs South Africa T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. 


भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत, आज सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसरा टी-20 समानाही जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?


भारताने पहिला टी-20 सामन्यात दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करून अभिषेक शर्मा बाद झाला. मात्र, तरीही त्याला संजू सॅमसनसोबत सलामीची संधी मिळू शकते. सॅमसनने शतक झळकावले होते. संजू सॅमसनने 50 चेंडूत 107 धावा केल्या होत्या.






खेळपट्टी कशी असेल?


सेंट जॉर्जियाच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिला तर या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना येथे मदत मिळू शकते. त्यामुळे आजही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला बाउन्स देखील मिळू शकते. आतापर्यंत येथे 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघानेही दोन सामने जिंकले आहेत.


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.


दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, नाकाबा पीटर आणि ओटनीएल बार्टमन.


संबंधित बातमी:


सूर्या दादाशी पंगा तर मैदानात दंगा... IND vs SA मॅचमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! नेमकं घडलं काय? पाहा व्हिडीओ