Virat Kohli On Daughter Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनु्ष्का शर्मा सध्या तिच्या फिल्मी करियरमधून ब्रेक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी वेळ देताना दिसत आहे. तर विराट कोहलीही क्रिकेटच्या सामन्यादरम्यानचा वेळ त्याच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त घालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने अलिकडेच पती विराट कोहलीचा दोन्ही मुलांसोबतचा सुंदर फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिघांची एकत्र पहिली झलक पाहायला मिळाली. या फोटोमध्ये विराट मुलांसोबत वेळ घालवताना अत्यंत आनंदी असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
बापासारखी क्रिकेटर बनणार अनुष्का शर्माची लेक?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटपटू विराट कोहली जगातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. टी-20 विश्वचषक जिंकून त्याने कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. एकीकडे क्रिकेट करियरमध्ये विराट नवनवीन विक्रम रचत असताना, दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चांगल्या घडामोडी घडत आहेत. विराट कोहली दोन मुलांचा बाप असून तो सध्या क्रिकेटसोबत कुटुंबालाही वेळ देताना दिसत आहे. विराट कोहली पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. विराट कोहलीने आयपीएलच्या वेळी त्याच्या मुलीबद्दल केलेलं वक्तव्यही आता प्रकाशझोतात आलं आहे.
विराट कोहलीच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन
अलिकडेच, विराट कोहलीने एका मुलाखतीत मुलीबद्दल सांगितलं आहे. विराट कोहलीचा 5 नोव्हेंरला वाढदिवस होता. त्यानंतर त्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याला त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल विचारण्यात आलं. यावेळी विराटने यंदाच्या स्पेशल बर्थडे सेलिब्रेशनबद्दल सांगितलं. विराट कोहलीने यावेळी सांगितलं की, यावर्षीचा वाढदिवस त्याने पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका अन् अकायसोबत अतिशय शांततेने आणि आनंदात साजरा केला. 7 नोव्हेंबरला विराट कोहलीने एका कार्यक्रमात हे सांगितलं.
विराट यावेळी म्हणाला की, यावेळीचा वाढदिवस मुलगी वामिकासाठी खास होता, कारण ती नेहमी बर्थडे पार्टीसाठी उत्साहित असते. हा माझा आतापर्यंतचा सर्वात स्पेशल बर्थडे होता, कारण हा वाढदिवस मुलं आणि कुटुंबासोबत कोणताही गाजावाजा न करता, घरी शांततेत पार पडला.
"ती मस्त बॅट चालवते..."
विराट कोहलीने याआधी आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमच्या शोमध्ये सांगितलं होतं की, वामिका बॅट पकडायला शिकली आहे, तिला बॅट फिरवायला, खेळायला मजा येते. ती मस्त बॅट चालवते. विराट यावेळी म्हणाला होता की, वामिकाला तिची आपड जोपासण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. यावेळी त्याने स्पष्ट केलं होतं की, तो मुलांवर क्रिकेट खेळण्यासाठी दबाव टाकणार नाही. दरम्यान, चिमुकल्या वामिकाची सध्या आवड पाहता, ती मोठी होऊन वडील विराट कोहलीप्रमाणे क्रिकेटर होईल, आईप्रमाणे अभिनेत्री की आणखी काही पॅशन निवडेल, हे येत्या काळात पाहावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :