Yashasvi Jaiswal Wicket Controversy Ind vs Aus 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहिला मिळाला. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 84 धावांवर बाद झाला, मात्र त्याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आले त्यावरून गदारोळ झाला. मैदानावरील पंचांनी यशस्वीला नॉट आऊट दिले होते, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. स्निकोमीटरने चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क दर्शविला नाही, परंतु तरीही तिसऱ्या पंचाने यशस्वी जैस्वालला बाद घोषित केले. तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयामुळे यशस्वी खूप संतापलेला दिसला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतण्यापूर्वी त्याने अंपायरशी वाद घातला.
मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 340 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांनी अवघ्या 33 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर यशस्वी जैस्वालने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ऋषभ पंतसह भारताचा ट्रबलशूटर बनला. तो सामना वाचवेल असे वाटत असतानाच त्याच्या वैयक्तिक 84 धावांवर त्याला आऊट घोषित करण्यात आले.
ही घटना 71 व्या षटकात घडली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या शॉट बॉलवर लेग साईडवर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना यशस्वी जैस्वाल चुकवला. त्यानंतर चेंडू त्याच्या बॅटजवळून विकेटकिपर कडे गेला. ऑस्ट्रेलियन खेळाडूने जोरदार अपील केले, पण ऑनफिल्ड अंपायरने ते नाकारले. ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर स्निकोमीटरमध्ये जे दिसले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
नियमांनुसार, जर ऑनफिल्ड अंपायरने बॅट्समनला नॉट आऊट दिले आणि त्यानंतर डीआरएस घेतल्यानंतर तिसऱ्या पंचाला कोणताही निर्णायक पुरावा मिळाला नाही, तर अनेकदा निर्णय बदलला जात नाही. पण यशस्वी जैस्वालच्या बाबतीत तसे झाले नाही. चेंडू बॅटला लागला की नाही हे स्निकोमीटरवर स्पष्ट झाले, परंतु तरीही तिसऱ्या पंचाने फलंदाजाला बाद घोषित केले, ज्यामुळे गोंधळ उडाला.
गावसकर यांच्यासह तज्ज्ञांनी व्यक्त केली नाराजी
स्टार स्पोर्ट्सवर भाष्य करणाऱ्या सुनील गावसकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "स्निकोमीटरवर कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे." दीप दासगुप्ता आणि इरफान पठाण यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी रिकी पाँटिंगने त्याचे समर्थन करत स्पष्ट आऊट असल्याचे सांगितले. रवी शास्त्री यांनी स्निकोमीटरला सहावा ऑस्ट्रेलियन गोलंदाज असल्याचे म्हटले.
यशस्वी जैस्वालच्या आऊटचा निर्णय स्निकोमीटरवरून घेण्यात आला नाही, पण त्यानंतर आकाशदीपच्या आऊटचा निर्णयही स्निकोमीटरवरून घेण्यात आला, त्यावेळी हिंदी कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रींनी स्निकोमीटरबाबत मोठे वक्तव्य केले. रवी शास्त्री म्हणाले, आज स्निकोमीटर ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज आहे.
हे ही वाचा -