India vs Australia 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून मालिकेत अजून एक सामना बाकी आहे, जो 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला चौथ्या डावात 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 155 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या.






ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी यांच्या शतकी खेळीमुळे भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. दुसऱ्या डावाची वेळ आली तेव्हा कांगारू संघाने 234 धावा केल्या, त्यामुळे चौथ्या डावात भारताला 340 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.






टीम इंडिया फायनलमध्ये कधी आणि कशी पोहोचेल?


या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.  बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, जो पुढील वर्षाचा पहिला सामना असेल. फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल, अन्यथा ती फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. 






मात्र सिडनी कसोटी जिंकूनही टीम इंडियाला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार नाही. सिडनी कसोटी जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत जाणार की नाही, याचा निर्णय ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून होणार आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधण्यात भारताला यश आले तर ते WTC फायनलच्या शर्यतीत कायम राहतील. पण अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत घरच्या मैदानावर एकही सामना जिंकू नये अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल. म्हणजेच श्रीलंकेने ही मालिका 1-0 ने जिंकली, असे झाल्यास टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचवेळी श्रीलंकेने एकही सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. दुसरीकडे, श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले तर ते भारत आणि ऑस्ट्रेलियाला संपवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.


हे ही वाचा -


Yashasvi Jaiswal Wicket Controversy : अंपायर आणि स्निकोमीटर, दोन्हीमध्येही नॉटआऊट, पण तरीही यशस्वी जैस्वाल OUT, गावसकर म्हणाले, टेक्नोलॉजी कशाला वापरता?