India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे भारताने पर्थ कसोटीत 218 धावांची आघाडी घेतली आहे. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी 90 धावा करून नाबाद आहे. राहुल 62 धावा करून नाबाद आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अवस्था बिघडवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 104 धावा केल्या होत्या.
भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात बिनबाद 172 धावा केल्या. यावेळी राहुल आणि यशस्वी सलामीसाठी आले. राहुलने 153 चेंडूंचा सामना करत नाबाद 62 धावा केल्या. त्याने 4 चौकार मारले. यशस्वीने 193 चेंडूंचा सामना करत नाबाद 90 धावा केल्या. तो शतकाच्या जवळ आहे. या खेळीत यशस्वीने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मिळाली नाही विकेट
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारतीय सलामीच्या जोडीला बाद करता आले नाही. मिचेल स्टार्कने 12 षटकात 43 धावा दिल्या. जोश हेझलवूडने 10 षटकात 9 तर कर्णधार पॅट कमिन्सने 13 षटकात 44 धावा दिल्या. नॅथन लायनने 13 षटकात 8 धावा दिल्या. मात्र, यापैकी एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.
ऑस्ट्रेलियन डाव गडगडला
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 104 धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 26 धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅकस्वीन 10 धावा तर लॅबुशेन 2 धावा करून करून बाद झाले. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. ट्रॅव्हिस हेड 11 धावा करून बाद झाला. मिचेल मार्श 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतीय गोलंदाजांनी केला कहर
बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. बुमराहने 18 षटकात 30 धावा दिल्या. हर्षित राणाने 3 बळी घेतले. त्याने 15.2 षटकात 48 धावा दिल्या. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. त्याने 13 षटकात 20 धावा दिल्या. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट मिळाली नाही.