Ind vs Aus 1st Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाली. आता भारतीय गोलंदाजांवर आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि ऑस्ट्रेलियाला अवघ्या 104 धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध असे वाईट दिवस खूप दिवसांनी पाहायला मिळाले.
पण दरम्यान, ऋषभ पंतची एक मोठी चूक टीम इंडियाला महागात पडू शकते. कारण त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाने घेतला आणि त्यामुळे टीम इंडियाला 25 धावांचा फटका आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या एकापाठोपाठ एक नऊ विकेट्स काढल्या. पण पंतने केलेल्या चुकीचा फायदा घेत स्टार्क आणि हेझलवूड या शेवटच्या जोडीने केलेल्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करण्यात मदत झाली आहे. आता पर्थ कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाचे हेच कारण बनू शकते, अशी भीती आहे.
पंतची चूक, टीम इंडियाला 25 धावांचा फटका!
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट 79 धावांवर पडल्या होत्या. पण, त्यानंतर जोश हेझलवूडने मिचेल स्टार्कच्या साथीने अखेरच्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येमध्ये वाढ केली. जर पंतने हेझलवूडचा कॅच घेतला असता तर ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या विकेटसाठी किमान 25 धावांची भागीदारी झाली नसती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऋषभ पंतने बुमराहच्या चेंडूवर हेझलवूडचा झेल सोडला होता. अर्थात हेजलवुडने कोणतीही मोठी धावसंख्या उभारली नाही. शेवटपर्यंत नाबाद राहूनही त्याला केवळ 7 धावा करता आल्या.
तत्पूर्वी, पर्थ कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्येवर ऑल आऊट करण्याची संधी होती. पण पर्थने हेडलवूडचा झेल सोडल्यानंतर त्याचीही संधी हुकली. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी कसोटी धावसंख्या 83 धावा होती, जी त्यांनी 1981 मध्ये केली होती. पर्थ कसोटीत भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 104 धावांत ऑलआउट करत 46 धावांची आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा -