WTC 2025 Final Team India Qualification Scenarios : दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलियाची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. यासह दक्षिण आफ्रिके आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ गेला आहेत.






श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचे गुणांची टक्केवारी 63.33 सर्वाधिक आहे. या कारणामुळे संघ पहिल्या स्थानावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचे 60.71 टक्के गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे गुण 57.29 टक्के असून ते तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता या तीन संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी स्पर्धा आहे.






दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला मोठा धक्का!


दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेविरुद्धचा विजय हा भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तरच अंतिम फेरीत जाण्याची आशा आहे. ॲडलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ज्या प्रकारे पराभव झाला, ते लक्षात घेता त्यांना पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. ऑस्ट्रेलियात कांगारूना पराभूत करणे अजिबात सोपे नाही. जर भारताने अजून एक तरी सामना हारला तर भारताला पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करावी लागेल.






कारण दक्षिण आफ्रिकेला अजूनही पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिका खेळायची आहे. आणि तेथे पाकिस्तानने या मालिकेत प्रोटीज संघाचा पराभव केला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारताचे दरवाजे उघडू शकतात. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. त्या मालिकेतही श्रीलंकेच्या संघाने किमान एक सामना अनिर्णित ठेवावा किंवा सामना जिंकावा, अशी टीम इंडियाची इच्छा आहे. असे झाल्यास त्याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो.


हे ही वाचा -


WTC पॉइंट टेबलमध्ये 24 तासांत मोठा उलटफेर....! दक्षिण आफ्रिकेने घेतली झेप, टीम इंडियावर काय झाला परिणाम?