WTC 2025 Points Table SA vs SL 2nd Test : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतमध्ये मोठा बदल झाला होता. पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले होते, मात्र आता तब्बल 24 तासांनंतर पुन्हा एकदा बदल झाला आहे. अवघ्या एका दिवसानंतर ऑस्ट्रेलियाला आपले अव्वल स्थान सोडावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या श्रीलंकेवर विजयाने WTC गुणतालिकेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!
आता दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर गेलेल्यामुळे आता इतर संघांचे टेन्शन वाढले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला असून, त्याना न खेळता थेट दुसऱ्या स्थानावर यावे लागले आहे. जर आपण सध्याच्या पॉइंट टेबलबद्दल बोललो तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 63.33 च्या पीसीटीसह प्रथम स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पीसीटी 60.71 आहे, त्यामुळे त्याला दुसऱ्या क्रमांकावर यावे लागेल.
टीम इंडियावर काय झाला परिणाम?
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, ते अजूनही 57.29 च्या पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाची समीकरणे बदलली आहेत. आता त्याला येथून उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील, जे इतके सोपे काम होणार नाही.
जर आपण श्रीलंकेबद्दल बोललो तर, या सामन्यातील पराभवानंतर त्याचा पीसीटी 45.45 झाला आहे. हा संघ अजूनही चौथ्या स्थानावर आहे, मात्र आता अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याला जाण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. आता भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे चारच संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत.
दक्षिण आफ्रिकेला फायनल खेळण्याची मोठी संधी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका मालिकेतील हा शेवटचा सामना होता. आता दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी खेळायच्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला तर त्यांना डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. दरम्यान, या आघाडीच्या चार संघांसाठी आगामी काही सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण आणि परिस्थिती बदलत जाईल हे निश्चित आहे.
हे ही वाचा -