WPL : बीसीसीआयकडून डब्ल्यूपीएलच्या तारखांची घोषणा, नवी मुंबईत पहिली मॅच, फायनल 'या' दिवशी होणार
WPL: वुमेन्स प्रीमिअर लीगचा चौथा हंगाम येत्या 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. ही घोषणा डब्ल्यूपीएलचे चेअरपर्सन जयेश जॉर्ज यांनी घोषणा केली.

नवी दिल्ली : वुमेन्स प्रीमिअर लीगचा चौथा हंगाम येत्या 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयनं चौथा हंगाम नवी मुंबई आणि बडोदा येथे खळवला जाणार आहे. या हंगामाची सुरुवात 9 जानेवारीला होईल तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. अंतिम सामना बडोदा येथे होणार आहे. मुंबई इंडियन्सनं गेल्या हंगामात विजेतेपद मिळवलं होतं.
वुमेन्स प्रीमिअर लीग यापूर्वी फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयोजित केली जायची. मात्र, यावेळी भारतात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार असल्यानं त्यापूर्वी डब्ल्यूपीएल सुरु होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
नवी दिल्लीत आयोजित लिलावादरम्यान डब्ल्यूपीएलचे चेअरपर्सन जयेश जॉर्ज यांनी तारखांची घोषणा केली. डब्ल्यूपीएलचा हा हंगाम नवी मुंबई आणि बडोदा येथे होईल. फायनल बडोदा येथे होईल. WPL कारवां मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 9 जानेवारीला डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतानं वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महिला क्रिकेटचं आकर्षण वाढलं आहे. बडोद्यात 5 फेब्रुवारीला फायनल होणार आहे.
WPL स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सामने नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. दुसऱ्या टप्प्यातील सामने आणि अंतिम सामना बडोद्यात खेळवला जाणार आहे.
WPL ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली भारताची ऑलराऊंडर खेळाडू दीप्ती शर्मा हिच्यावर लागली. तिला यूपी वॉरिअर्सनं 3 कोटी 20 रुपयांमध्ये खरेदी केलं. तर, मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंडच्या एमेलिया केरसाठी 3 कोटी रुपये मोजले. दुसरीकडे भारतासाठी वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार फलंदाजी करणारी प्रतिका रावल ही अनसोल्ड राहिली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्यानं वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर गेली होती. त्यानंतर डब्ल्यूपीएलच्या ऑक्शनमध्ये तिला कोणत्याही संघानं खरेदी केलं नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं मिळवलं होतं. आता चौथ्या हंगामात डब्ल्यूपीएलचं विजेतेपद कोण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय महिला संघानं वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानं महिला क्रिकेटबद्दल आकर्षण वाढलं आहे. त्याचा फायदा डब्ल्यूपीएलला होऊ शकतो.




















