(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्याला सुरुवात, बंगळुरुने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी
MI-W vs RCB-W : पहिल्या सामन्यात 143 धावांनी विजय मिळवलेला मुंबईचा संघ पहिला सामना गमावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला असून आरसीबी प्रथम फलंदाजी करत आहे.
WPL 2023, RCB vs MI : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (6 मार्च) हंगामातील चौथा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) या संघांमध्ये होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने पहिला सामना 143 धावांनी गुजरातविरुद्ध जिंकला असून आरसीबीने पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघात दमदार खेळाडूंचा भरणा असून मुंबईची मदार भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतवर तर आरसीबीची मदार भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनावर आहे.
View this post on Instagram
सलामीच्या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला तर 5 मार्च रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स संघाचा 60 धावांनी पराभव केला. त्यामुळे आरसीबी संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या नजरा विजयाकडे असतील. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे संघ WPL मध्ये जिंकत असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे आज आरसीबीने आज फलंदाजी निवडली असावी. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-