(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DCW vs UPW : युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला सुरुवात, दिल्लीनं घेतला गोलंदाजीचा निर्णय
UPW-W vs DC-W, Match Preview : महिला आयपीएलच्या लीग फेरीतील अखेरचा सामना आज युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळवला जाणार असून दिल्ली संघानं नाणेफेक जिंकली आहे.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून आज लीग स्पर्धेतील अखेरचा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (UP Warriors vs Delhi Capitals) असा खेळवला जात आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकत दिल्ली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
युपी वॉरियर्स संघाचा विचार करता, त्यांचा संघ तीन बदलांसह मैदानात उतरला आहे. यावेळी ग्रेस हॅरिस, राजेश्वरी गायकवाड आणि देविका वैद्य या तिघी संघात नाही. एस. यशश्री ही पदार्पण करत असून अंजली सरवाणी, शबनिम इस्माईल या देखील संघात आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने एकही बदल न करता संघ मैदानात उतरवल आहे. त्यांनी दमदार मुंबई इंडियन्सला मात दिलेलाच संघ मैदानात उतरवला आहे. तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
युपी वॉरियर्सचा संघ : श्वेता सेहरावत, अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, सिमरन शेख, पार्शवी चोप्रा, अंजली सरवाणी, सोप्पधंडी यशश्री, शबनीम इस्माईल
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव
आतापर्यंत दिल्ली आणि युपीचा प्रवास
महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी देखील प्रत्येकी 7-7 सामने खेळले असून दिल्ली कॅपिटल्स संघाने 5 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. तर युपी संघाने 4 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत.दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून मुंबई इंडियन्सही प्लेऑफचे सामने खेळणार आहे. दोघांनी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो.
सामना कधी, कुठे पाहाल?
युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार असून या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-