World Cup Qualifiers 2023, Zimbabwe's Record : वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात झिम्बाब्वे संघाने मोठा विक्रम केला आहे. जगजेत्या वेस्ट इंडिजला पराभव केल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या झिम्बाब्वे संघाने आणखी एक पराक्रम केलाय. झिम्बाब्वेनं विश्वचषकाच्या सामन्यात 400 धावांचा पल्ला पार केला आहे.  युनाइटेड स्टेट्सविरोधोत झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात 408 धावांचा पल्ला पार केला आहे. कर्णधार सीन विलियम्स याने 176 धावांची दमदार खेळी केली. 


झिम्बाब्वेने वनडे इतिहासात पहिल्यांदाच 400 धावांचा पल्ला पार केला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सीन विलियम्स याने धुवांधार 176 धावांची खेळी केली. त्याशिवाय जॉयलॉर्ड गुम्बी याने 103 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 78 धावांचे योगदान दिले. तर सिकंदर रझा याने 48 आणि रयान बर्ल याने 47 धावांची झंझावती खेळी केली. रझा याने पाच चौकार आणि दोन षटकारांचा पाऊस पाडला तर रयान बर्ल याने 3 चौकार आणि 4  षटकारांचा पाऊस पाडला.


भारताचा विक्रम थोडक्यात बचावला -


झिम्बाब्वेने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच 400 धावांचा पल्ला पार केला. 408 धावा करत झिम्बाब्वेने विराट धावसंख्या उभारली. भारताचा रेकॉर्ड अवघ्या 5 धावांनी कायम राहिलाय. भारताने 2007 च्या विश्वचषकात 413 धावांचा डोंगर उभारला होता. ही धावसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा क्रमांक लागतो. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरोधात 417 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकाने 2015 मध्येच आयरलँडविरोधात 411 धावा केल्या आहेत. 


विलियम्सचं द्विशतक हुकले
झिम्बाब्वेनं 400 धावांचा पल्ला पार केला, यामध्ये कर्णधार सीन विलियम्स याचं मोठं योगदान होते. विलियम्स याने 101 चेंडूत 21 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. अवघ्या 26 धावांपासून तो द्विशतकापासून दूर राहिला. त्याने 172 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. 
36 वर्षीय कर्णधार विलियम्स याने झिम्बाब्वेसाठी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. क्वालिफायर सामन्यात त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. नेपाळविरोधात नाबाद 102, नेदरलँढविरोधात 91 धावांची खेळी केली होती. त्यानंतर यूनाइटेड स्टेट्सविरोधात नाबाद 174 धावांचा पाऊस पाडलाय. 


अजये झिम्बाब्वे -
क्वालिफायर फेरीमध्ये झिम्बाब्वेचा संघ आतापर्यंत अजेय आहे. झिम्बाब्वेच्या संघाला एकही पराभव झाला नाही. झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात नेपाळचा आठ विकेटने पराभव केला होता. त्यानंतर नेदरलँडला सहा विकेटने मात दिली. दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजचा 35 धावांनी पराभव केला. झिम्बाब्वेने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. 


आणखी वाचा : 


World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती


Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक


World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने


पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार


ICC World Cup 2023 Schedule : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!


ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग