ICC World Cup 2023 Full Schedule : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान यांच्यात थरार -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे. या सामन्याला एक लाख प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने अहमदाबाद येथे सामना खेळण्यास नकार दिला होता, पण आयसीसीने आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिलाय.
8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना -
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानात सामना रंगणार आहे.
इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात -
वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या मैदानात विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.
अहमदाबादमध्ये सुरुवात आणि शेवट
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी होणारा फायनल सामनाही अहमदाबाद येथील स्टेडिअवर होणार आहे. मुंबई आणि कोलकाता येथील मैदानावर सेमी फायनलचा थरार रंगणार आहे. भारत जर सेमीफायनलमध्ये पोहचला तर मुंबईमध्ये सामना होणार आहे.
12 मैदानावर रंगणार विश्वचषकाचा थरार -
भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडिअवर पाच सामने -
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाच सामने होणार आहेत. यामध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उद्घाटानाचा सामना होणार आहे. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारही याच मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. फायनलचा थरारही अहमदाबाद मैदानावर होणार आहे.
ICC World Cup 2023 Full Schedule : आयसीसी वर्ल्ड कप 2023 चं संपूर्ण वेळापत्रक -
5 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - अहमदाबाद
6 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-1 - हैदराबाद
7 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध अफगानिस्तान- धर्मशाला
8- ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चेन्नई
9- ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलीफायर-1 हैदराबाद
10- ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध बांगलादेश- धर्मशाला
11- ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगानिस्तान- दिल्ली
12- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-2 - हैदराबाद
13- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ
14- ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - चेन्नई
15- ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान - अहमदाबाद
16- ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलीफायर-2 - लखनौ
17- ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वॉलीफायर-1 - धर्मशाला
18- ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगानिस्तान- चेन्नई
19- ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश - पुणे
20- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगलोर
21- ऑक्टोबर- इंग्लंड -दक्षिण आफ्रिका - मुंबई
22- ऑक्टोबर- क्वॉलीफायर-1 विरुद्ध क्लॉलीफायर-2 - लखनौ
23- ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूजलैंड- धर्मशाला
24- ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वॉलीफायर-2 - दिल्ली
25- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलीफायर-1 दिल्ली
26- ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर-2 - बेंगलोर
27- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका - चेन्नई
28- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला
29- ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड - लखनौ
30- ऑक्टोबर- अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-2 - पुणे
31- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश - कोलकाता
1- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पुणे
2- नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वॉलीफायर-2 - मुंबई
3- नोव्हेंबर- अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-1 - लखनौ
4- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - अहमदाबाद
4- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - बेंगलोर
5- नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कोलकाता
6- नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध क्वॉलीफायर-2 - दिल्ली
7- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान - मुंबई
8- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर-1 - पुणे
9- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलीफायर-2- बेंगलोर
10- नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगानिस्तान - अहमदाबाद
11- नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वॉलीफायर-1 - बेंगलोर
12- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - कोलकाता
12- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे
15- नोव्हेंबर- सेमीफाइनल-1 - मुंबई
16- नोव्हेंबर- सेमीफाइनल-2 - कोलकाता
19- नोव्हेंबर - फायनल- अहमदाबाद