ICC Mens Cricket World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथेच होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानची विनंती फेटाळत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. जय शाह यांनी आज मुंबईत घोषणा केली. वर्ल्ड कप फायनल आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. 


भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. 


पाकिस्तानने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला होता. ठिकाण आणि सराव सामन्यावरुन बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्य सुरु होते. पाकिस्तान आणि भारत या दोन देशात असलेल्या वादाचा परिणाम वेळापत्रकावर झाला होता. भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही, त्यामुळे पाकिस्ताननेही भारतात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पण  आता पाकिस्तानच्या या नाट्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने पाकिस्तानची विनंती फेटाळून लावली आहे. आता 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार रंगणार आहे.


नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाच सामने होणार आहेत. यामध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उद्घाटानाचा सामना होणार आहे. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारही याच मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. फायनलचा थरारही अहमदाबाद मैदानावर होणार आहे.